Ad will apear here
Next
‘चतुरंग’चे ‘रंगसंमेलन’ प्रथमच पुण्यात
पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘रंगसंमेलना’चे यावर्षी प्रथमच पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.

आजवरच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत २२ वेळा मुंबईत आणि तीन वेळा गोव्यात झालेल्या रंगसंमेलन सोहळ्यात लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नारळीकर, डॉ. भटकर, साधना आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, डॉ. राम ताकवले यांसारख्या २६ दिग्गजांना ‘चतुरंग’चा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार मूर्तीशास्त्र आणि भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्र विषयांचे तज्ज्ञ, अभ्यासक-संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना दिला जाणार आहे.

पुणे येथे प्रथमच होणाऱ्या या दोन दिवसीय रंगसंमेलन सोहळ्यात कलावंतांची गायन जुगलबंदी, ४० कलाकारांच्या सहभागाचा नेत्रदीपक नृत्याविष्कार, नाट्य अभिनय दर्शन, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची वादन जुगलबंदी मैफल, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाची दर्जेदार मुलाखत, सुमारे अडीच हजार रसिकांच्या उपस्थितीत मान्यवर व मातब्बरांसह तासाभराचे एकत्रित चहापान संमेलन आणि दोन भव्य समारंभ असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. ‘रंगसंमेलना’चे उद्घाटन २७ नामवंत पुणेकर कलाकारांच्या हस्ते अभिनव पद्धतीने होणार आहे. ‘रंगसंमेलना’च्या ‘स्वागतयात्री योजने’ची नोंदणी पाच ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.   

रंगसंमेलनाविषयी :

दिवस : १६ व १७ डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी चार ते १०
स्थळ : गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क :
32, पुष्पश्री, एस. पी. कॉलेजच्या मागे, सदाशिव पेठ, लोकमान्य नगर, पुणे. ९८९०४ ९०४९०, ७०३०२ ५५००४  
संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते ११ आणि सायंकाळी पाच ते आठ
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZROBI
Similar Posts
रंगसंमेलनात रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येथे प्रथमच होणाऱ्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ने पुणेकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आखले आहेत. सॅक्सोफोन आणि बासरीच्या ‘नाद नभांगणी नाचतो’ या वादनजुगलबंदीने रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे. विद्वान पं. कद्री गोपालनाथ आणि पं. रोणू मजुमदार यांच्या या ‘वादनारंगा’ला पं. अरविंद आझाद (तबला) आणि बी
डॉ. देगलूरकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव २०१७’ पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘रंगसंमेलन २०१७’मध्ये डॉ. देगलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल
‘चतुरंग’च्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ला प्रतिसाद पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘मुक्तसंध्या’मध्ये उलगडला अशोक पत्कींचा सुरेल प्रवास पुणे : एकाहून एक सरस मालिकांची शीर्षकगीते, मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी भावगीते यांपासून सुरू झालेल्या स्वर-शब्द मैफलीदरम्यान ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा प्रवास रसिकांसमोर उलगडला. निमित्त होते ते येथील चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘मुक्तसंध्या’ कार्यक्रमाचे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language